अक्षय लांजेवार व अजित सुकारे यांचे अन्नत्याग आंदोलन
चिमूर - ओबीसींच्या न्याय मागण्या अद्यापही मान्य न झाल्याने राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने चिमूर क्रांतीभूमीतून ७ दिसेंबर पासून राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे चिमूर तालुका अध्यक्ष अक्षय लांजेवार व अजित सुकारे यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू झाले आहे. चंद्रपूर येथे ओबीसींच्या मागण्यांसाठी रविंद्र टोंगे, विजय बल्की आणि प्रेमानंद जोगी यांनी दि.११ सप्टेंबर पासून आंदोलन सुरू केले होते. दरम्यान ओबीसींच्या शिष्टमंडला सोबत शासनाच्या झालेल्या चर्चेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० सप्टेंबरला चंद्रपुरात येऊन अन्नत्याग आंदोलन आश्वासन देऊन सोडविले होते. परंतु ओबीसींच्या न्याय मागण्या अद्यापही मान्य झाल्या नाही. त्यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने चिमूर क्रांतीभूमीतून ७ डिसेंबर पासून राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे तालुका अध्यक्ष अक्षय लांजेवार व अजित सुकारे यांचे आंदोलन सुरू झाले आहे.