ओबीसी बहुजन समाज संघटनेच्या वतीने शनिवार दि. ९ रोजी दुपारी १२ वाजता समस्त ओबीसी बहुजन संघटना खटाव - माण तालुक्यातील सर्व नागरिकांचा मेळावा मधुमाला सांस्कृतिक भवन, वडूज ( वडूज - पुसेगाव रोड) येथे आयोजित केला असल्याची माहिती खटाव तालुका ओबीसी बहुजन समाज संघटनेचे अध्यक्ष सचिन पवार यांनी दिली. सदर मेळाव्यास सातारा जिल्हा ओबीसी बहुजन समाज संघटनेचे अध्यक्ष भरत लोकरे मार्गदर्शन करणार असून सदर मेळाव्यासाठी खटाव- माण तालुक्यातील समस्त ओबीसी समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.