वडीगोद्री : ओबीसी बचावच्या साखळी उपोषणाला सुरुवात

६० गावातील ओबीसी बांधव एकवटले: मंत्री छगन भुजबळ यांनी फोन वरून संवाद

    वडीगोद्री : झुंडशाही व दादागिरी आहे. जे काही बेकायदा पिस्तूल घेऊन फिरणारे लोक असतील बीड मध्ये जाळपोळ करणारे लोक असतील आणखी जी काही गुंडगिरी चालू आहे आपण त्या विरोधात आहोत असा टोला ओबीसी नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी वडीगोद्री येथे ओबीसी बचावासाठी सुरु झालेल्या साखळी उपोषण दरम्यान ओबीसी बांधवाशी फोन द्वारे जो संवाद लगावाला आहे.

Vadigodri_OBC_Aarakshan_Bachao_sakhali_uposhan     यावेळी या ओबीसी साखळी उपोषणास पाठींबा देण्यासाठी अंबड, परतूर, मंठा, पैठण जालना या ठिकाणाहून ओबीसी बांधव मोठ्या संख्येने आले आहेत. साखळी उपोषणाच्या पहिल्या दिवशी वडीगोद्री गावातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने साखळी उपोषणास बसले आहे. या साखळी उपोषणास ६० गावांचा समावेश आहे.

    अंतरवाली सराटी फाटा वडीगोद्री येथे दत्त मंदिरात ओबीसी समाज आरक्षण बचाव करीता मंगळवार दि.५ पासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले. या ठिकाणी बाजार स्थळ वडीगोद्री ते उपोषण स्थळापर्यंत ओबीसी समाज बांधवांनी भव्य मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीत भागातील मोठा ओबीसी जनसमुदाय उपस्थित होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करूण गावात ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक या वेळी काढण्यात आली.

    आमचे आरक्षण शाबुद ठेवा मराठा सम जास वेगळे आरक्षण द्यावे आधिच ओबीसी मध्ये अनेक जाती आहे येथे गर्दी झालेली आहे या मध्ये जास्त वाटेकरी नकोत. जे खरे कुणबी आहे त्यांना आमचा विरोध नाही मात्र खोटे प्रमाणपत्र घेऊन कोणी ओबीसी मध्ये घुसत असतील तर त्यांना विरोध आहे. आता ओबीसी एक झाला आहे या उपोषण बाबत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी फोनवर ओबीसी बांधव यांच्या सोबत संवाद साधला. ओबीसी आरक्षण बचाव करीता दि. २३ डिसेंबर रोजी नागरीकांनी वडीगोद्री येथे उपस्थित रहावे असे संयोजकांनी सांगितले आहे. ओबीसीच्या साखळी उपोषणाच्या पहिल्यां दिवशी अंबड तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी भेट दिली आहे.
गोपीचंद पडळकर यांनी साधला संवाद वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षण बचाव करता आंदोलन होत आहे या उपोषणास आमचा पाठींबा आहे. ओबीसी मधिल छोटे समाज आपल्या न्याय हक्का साठी लढत आहे. आम्ही आपल्या सोबत असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.

    अंतरवाली सराटी पासून एक किमी अंतरावर असलेल्या वडीगोद्री येथे वडीगोद्री - अंतरवाली सराटी रोडवरील दत्त मंदिर येथे ओबीसी च्या साखळी उपोषणास सुरुवात झाली असून हे ओबीसी ला दिशा देणारे ठरणार आहे.