चंद्रपूर - राज्यातील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी मागणी केली होती, त्या मागणीला ओबीसी समाजाने तीव्र विरोध दर्शवला. आता मात्र जरांगे पाटलांनी हद्दच केली आहे, आई ओबीसी असेल तर ओबीसी जात प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी जरांगे पाटलांनी केली. त्यांची ही मागणी हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपुरात येऊन उपोषणाची सांगता करीत आश्वासन पूर्ण करण्याचे लेखी पत्र सुद्धा देण्यात आले. जरांगे पाटील यांनी आई ओबीसी असेल तर जात प्रमाणपत्र देण्याची मागणी हास्यास्पद आहे, मग आई अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त भटक्या प्रवर्गातील असेल तर ते सुध्दा स्वीकार करणार का ? असे सचिन राजुरकर यांनी म्हटले आहे.