Deshache Dushman by Satyashodhak Dinkarrao Javalkar - देशाचे दुश्मन - Page 5 मुख्य मजकूराकडे जा

देशाचे दुश्मन

Deshache Dushman by Satyashodhak Dinkarrao Javalkar

Page 5 of 27
15 एप्रिल 2023
Book
1,2,7,3,5,,,

देशाचे दुश्मन, ( भाग 5) लेखक  -  सत्यशोधक दिनकरराव जवळकर

    व्हावयाला वेळ लागला नसता. महाराष्ट्राच्या या क्षत्रिय मनगटात जर मराठी रक्ताचे तेज सळसळत नसते, तर आज रस्तोरस्ती मिरवणाऱ्या ब्राह्मण माद्या मुसलमानी इष्केशराबात गळ्याइतक्या नाही, तरी कंबरेइतक्या खास बुडून गोष्याच्या पडद्याआड डांबलेल्या दिसल्या असत्या. ज्या बाईलजाद्या भटभिक्षुकांचे ब्रह्मतेज इस्लामी चांदताऱ्यापुढे थरथर कापून माजघरातल्या पलंगापर्यंत डोळे झाकीत असे, तेच शेळपट ब्रह्मतेज कृतघ्नपणाची कमाल करून जेव्हा शिवबा राज्याभिषेकाला स्वारीत चालले तेव्हा, डोक्याला धोतरे बांधून मिरवणुकीपुढे आडवे पडले. 'शुद्र राजा राज्याभिषेक करून घेतो, म्हणून धर्म बुडाला म्हणणाऱ्या भिक्षुकी मनाला, एखादी भटीण शूद्र पलंगावरून उड्या ठोकीत आली तरी समजत नाही !' राज्याची भिक्षा मागायला अल्लख म्हणून येणारा गोसावडा रामदास या राज्याभिषेक प्रसंगी कोठल्या मठीत गांजा खेचीत बसला होता ! याचा उलगडा भटोबा करतील काय ? जेव्हा तेव्हा शिवाजीचे गुरूपद रामदासी झोळीत टाकणाऱ्या आजच्या भटांचा भगवा भंगड रामदास बजाजीखानाच्या शुद्धीप्रसंगी कोठे वेणुताईच्या महालात

'सदा सर्वदा योग तुझा घडावा
तुझ्या कारणी देह माझा पडावा'

Deshache Dushman by Satyashodhak Dinkarrao Javalkar

    हा शृंगार मंत्र शिष्यीणीला शिकवीत होता काय ? सहस्र भोजनाच्यावेळी पंगत ठोकून बसणारे हे अन्नावरचे किडे या दोन्ही प्रसंगी कोठे तोंड काळे करून बसले होते ? बजाजीखानाचा शुद्धीविधी शिंगणापूरी शंभुपुढे एका गुरवाने केला. तेथे डोळ्यात घालायलासुद्धा भट गेला नाही. रामदास शिवाजी महाराजांना भेटला असल्यास अगदी शेवटी भेटला, हे ऐतिहासिक सत्य लपविणाऱ्या टिळक-चिपळूणकरांच्या चेल्यांनी उपरिनिर्दिष्ट दोन समारंभात रामदास कुठल्या गिरीकंदरात वनभोजनाला गेला होता, हे सप्रमाण दाखवून द्यावे. ज्या ब्राह्मण संस्कृतीने शिवनृपाला सतावले, त्याच बारुळवासी संस्कृतीचे टिळक-चिपळूणकर हे आधारस्तंभ होते. कलुशा कबजी ह्या ब्राह्मण अवलादीने तर शंभू छत्रपतीची xxx करून श्रेष्ठत्व मिळविले आणि शेवटी निमकहरामपणाची जात दाखवली. कोकणातून वक्रगतीने डोंगर चढून आल्यामुळे सवयीने पुन्हा वक्रगतीनेच चालणाऱ्या

Book Pages

Page 5 of 27