मुख्य मजकूराकडे जा

मुक्‍ती कोन पथे ?

Mukti Kon Pathe book writer Dr B R Ambedkar

Page 8 of 15
19 नोव्हेंबर 2021
Book
5,1,7,3,,

मुक्‍ती कोन पथे ?  लेखक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

अस्पृश्यातील संघटन आणि धर्मांतर

     अस्पृश्यता निवारणाची जी आज चळवळ चालू आहे त्या चळवळीवर अशी टीका करण्यात येते कि अस्पृश्य वर्गात ज्या निरनिराळ्या जातीचा समावेश झालेला आहे, त्या जातीत ही परस्परांतील व्यवहारामध्ये जातीभेद पाळण्यात येतो नव्हे अस्पृश्यता पाळण्यात येते. महार मांग एकमेकांच्या हातचे खात नाहीत. दोघेही मुंग्यासारख्या जातीला शिवत नाहीत व त्यांच्याशी अस्पृश्यता पाळतात. परस्पर जातीभेद अस्पृश्यता पाळणाऱ्या लोकांना वरच्या जातीकडून तुम्ही जातीभेद मोडा, अस्पृश्यता मानू नका, असे म्हणण्याचा काय अधिकार आहे ? असा प्रश्न नेहमी विचारण्यात येतो. तुम्ही आपसातील जातीभेद व अस्पृश्यता नाहीशी करा मग आमच्याकडे दाद मागाण्यास या, असा साळसूदपणाचा सल्ला त्यांना देण्यात येत असतो. या टिकेच्या मुळाशी असलेल्या कधेत सत्य आहे, हे आपल्यापैकी सर्वाना कबूल करावे लागेल. पण त्या टिकेत केलेला आरोप मात्र खोटा आहे. अस्पृश्य वर्गात समाविष्ट झालेले लोग जाताभेद पाळतात व काही अस्पृश्यता पाळतात, या गोष्टीचा इंकार करता येणे शक्य नाही, या मोष्टी मान्य करणे प्राप्त असले तरी या अपराधाला तें कारणीभूत आहेत असे म्हणणे निखालस खोटे आहे, जातीभेदाचा व अस्पृश्यतेचा उगम अस्पृश्य लोकांपासून झालेला नाही. जातीभेदाचा व अस्पृश्यतेचा उगम वरिष्ट वर्गीय हिंदूंच्या हातून झालेला आहे, जातीभेदाचा व अस्पृश्यतेचा उगम वर अस्पृश्य लोकांपासून झालेला नाही, जातीभेदाचा व अस्पृश्यतेचा पायंडा त्यांनी घातलेला आहे. जातीभेद व अस्पृश्यता पाळण्याचा धडा वरिष्ट वर्गीयांनी दिलेला आहे. ही गोष्ट जर सत्य असेल तर जाताभेदाच्या व अस्पृश्यतेच्या रुढीची जबाबदारी स्पृश्य वर्गावरच पडते, अस्पृश्य वर्गावर ती पडू शकत नाही अस्पृश्य वगचि लोक जातीभेद व अस्पृश्यता पाळतात वरच्या वर्गातील लोकांनी दिलेला धडा गिरवीत आहेत. तो धडा जर खोटा आहे तर त्याचे पाप ज्यांनी तो धडा दिला त्याच्यावरच येऊन पडते. त्यांनी गिरवीला त्याच्यावर येऊन पडू शकत नाही. हे उत्तर जरी समर्थक असले तरी या उत्तराने माझे स्वतःचे समाधान होऊ शकत नाही. ज्या कारणामुळे अस्पृश्यता व जातीभेद हा आपल्या मध्ये शिरला त्या कारणाला आपण जरी जबाबदार नसतो तथापि आपल्या मध्ये जो जातीभेद व जी अस्पृश्यता नांदत आहे तिचा धिक्कार न करणे, ती आहे तशीच चालू देणे आपल्याला इष्ट नाही. अस्पृश्यतेचा व जातीभेदाचा शिरकाव करण्यास जरी आपण जवाबदार नसलो तरी ती घालवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. हा जबाबदारी आपण सर्वाना ओळखली आहे. याबद्दल मला समाधान वाटते. माझी खात्री आहे कि महार जातीत असा कोणीही पुढारी नाही कि जातीभेद पाळावा असे तो म्हणतो. तुलनाच करावयाची झाली तर तो पुढाऱ्यांमध्येच केली पाहिजे. महारातील शिकला सावरलेला वर्ग घेतला आणि ब्राहाणातील शिकला सावरलेला वर्ग ज़री घेतला व दोघांची तुलना केली तर अस्पृश्य वर्गातील सुशिक्षित वर्ग जातीभेद मोडायला जास्त अनुकूल आहे. हि गोष्ट कोणास ही कबूल करावी लागेलं. इतकेच नव्हे तर ती गोष्ट कृतीने हि सिद्ध करून देता येईल. महारातील सुशिक्षित वर्ग या सुधारायला अनुकूल आहे हे सिद्ध करून देता येईल. आज महारांमध्ये असा एकही मनुष्य सापडायचा नाही कि जो महार मांगात रोटी व्यवहार व्हावा याच्या विरुद्ध असेल. आपल्यातील जातीभेद मोडण्याचा आवश्यकता तुम्ही ओळखता या गोष्टीबद्दल मला मोठ समाधान वाटते व मी तुमचे अभिवादन करू इच्छितो. परंतु अस्पृश्यांतील जातीभेद मोडण्याचा प्रयत्न कसा यशस्वी करता येईल याचा तुम्ही विचार केला आहे काय ? सहभोजने केल्याने किंवा क्वचित प्रसंगा सहविवाह केल्याने जातीभेद मोडू शकत नाहीत. जातीभेद हि एक मानसिक स्थिती आहे. एक मानसिक व्यथा आहे. हि मानसिक व्यथा जडण्याचे कारण हिंदु धर्माची शिकवण हि आहे. आपण जातीभेद पाळतो, अस्पृश्यता पाळतो याचे मुख्य कारण ज्या हिंदु धर्मात आपण आहोत तो धर्म तसे करावयास सांगतो म्हणून. वस्तू कडू असेल तर ती गोड करता येईल. खारट असेल तर तुरट असेल तर तिची रुची बदलता येईल पण विषाचे अमृत करता येणार नाही. हिंदु धर्मात राहून जातीभेद नष्ट करू असे म्हणतो म्हणजे बिषाचे अमृत करू असेच म्हणण्यासारखे आहे.

Mukti Kon Pathe book written by Dr B R Ambedkar

     अर्थात ज्या धर्मात माणसाची घाण माणसाने मानली पाहिजे अशी शिकवण देण्यात येत आहे त्‍या धर्मात आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत जातीभेद नाहीसा होणार नाही. आपल्या मनातील जातीभेद व अस्पृश्यता नाहीशी करावयाची असल्यास त्यांना धर्मांतर करणे हा एकच रामबाण उपाय आहे.