मुक्ती कोन पथे ?
Mukti Kon Pathe book writer Dr B R Ambedkar
मुक्ती कोन पथे ? लेखक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
धर्मांतराची आध्यात्मिक कारणे
येथपर्यंत ऐहिक कल्याणाकरिता धर्मांतराची आवश्यकता काय आहे याचे दिग्दर्शन केले आहे आता अध्यात्मिक कारणाकरिता धर्मांतराची कशी आवश्यकता आहे या विषयीचे माझे विचार तुमच्या समोर मी मांडीत आहे. प्रथमत: धर्म कशाकरिता असतो? त्याचा आवश्यकता काय? हे जाणून घेतले पाहिजे. धर्मांतराच्या अनेक व्याख्या अनेक लोकांना केलेल्या तुम्हाला सापडतील. पण त्या सर्वांमध्ये अर्थपूर्ण व सर्वाना पटण्यासारखी अशी एकच व्याख्या आहे. 'ज्याने सर्व प्रजेचे धारण होते तोच धर्म. हीच ती खरा धर्माची व्याख्या होय. ही धर्माची व्याख्या मी केलेली नसती तरी हि व्याख्या सनातनी हिंदूचे अग्रगण्य लोकमान्य टिलक यांनीच दिलेली आहे. तेंव्हा धर्माच्या व्याख्येबद्दल मखलाशी केल्याचा आरोप माझ्यावर कोणी करू शकणार नाही ही व्याख्या जरी मी केलेली नसती तरी मी ती वादाकरिता मान्य केलेली आहे अशातला भाग नाही, मला ती कबूल आहे. समाजाच्या धारणेकरिता घातलेली बंधने म्हणजे धर्म, हीच माझी देखील धर्माची कल्पना आहे. ही व्याख्या वास्तविक दृष्टया अथवा तात्विक दृष्टया योग्य अशी दिसली तरी समाजाच्या धारणेकरिता समाजाची बंधने कशा प्रकारची असावीत या प्रश्नांची या व्याख्येवरून काहीच बोध होऊ शकत नाही; अथवा उलगडा ही होऊ शकत नाही. समाजाच्या योग्य धारणेकरिता समाजाची बंधने कशी असावीत हा प्रश्न शिल्लक राहतोच. व हा प्रश्न धर्माच्या व्याख्येपेक्षा फार महत्वाचा आहे. कारण धर्म कोणता हे व्याख्येवरून अवलंबून नसून बांधण्याच्या हेतूवर व स्वरुपावर अबलंबून आहे.
समाज आणि व्यक्ती
ज्याप्रमाणे थेंब समुद्राच्या पाण्यात टाकला असताना त्याचा लोप होतो तसा माणसाला तो केवल समाजात राहिला म्हणून त्याचा लेप होऊ शकत नाही. त्याचे जीवन स्वतंत्र असते. त्याचा जन्म समाजाच्या सेवेकरिता नसून आत्मोन्नती करिता आहे. या प्रकार कारणामुळे सुधारलेल्या राष्ट्रात एका माणसाला दुसऱ्या माणसाशी आपला गुलाम करून जाता येत नाही, ज्या धर्मात व्यक्तीला प्राधान्य नाही तो धर्म मला मान्य होऊ शकत नाही. तमेच ज्या धर्मात एका वर्गाने विद्या शिकावा दुसन्या वर्गाने शस्त्र धरावे, तिसन्याने व्यापार करावा व चौथ्याने नुसती सेवा करावी, असे आहे तो धर्म मला मान्य नाही. विद्या दरेकाला हवी. शस्त्राचा दरेकाला जरुरी आहे. पैसा सर्वाना पाहिजे. हि गोष्ट जो धर्म विसरतो व जो एकाला सज्ञान करण्याकरित्ता बाकीच्यांना अज्ञानात ठेवतो तो धर्म नसून लोकांना बौद्धिक गुलामगिरात ठेवण्याचा कावा आहे. जो धर्म काहींना धन संपादनाचा मार्ग मोकळा ठेवतो व बाकीच्यांना आपल्या जीविकेकरिता दुसऱ्यावर अबलंबून राहाण्याचा अनुज्ञा देतो तो धर्म नसून ती स्वार्थ परायणता आहे. हिंदू धर्मातील चातुर्वर्ण्य हे असे आहे. त्याविषयी माझे मत काय आहे हे मी स्पष्टपणे मांडिले आहे. हा हिंदू धर्म तुम्हाला हिताचा आहे की काय याचा तुम्ही विचार करा. व्यक्तीच्या आत्मोन्नतीला पोषक असे वातावरण उत्पन्न करणे ही धर्माची मूलभूत कल्पना आहे. हे जर मान्य केले तर हिंदू धर्माने तुमची आत्मोन्नती कधीही होऊ शकणार नाही. व्यक्तीच्या विकासाला तीन गोष्टींचा अनावश्यकता को, सहानुभूती, समता आणि स्वातंव्य. हिंदू धर्मातील या तिन्ही गोष्टी पैकी एक तरी बाब तुमच्या करिता उपलब्ध आहे असे तुम्हाला म्हणता येईल काय ?