दगाबाज सुर्याजी पिसाळ नव्हे तर कृष्णाजी भास्कर कुळकर्णी होय.
Bahujananche Marekari prastavana
बहुजनांचे मारेकरी - लेखक बापु म. राऊत
कृष्णाजी भास्कर कुळकर्णी हा ब्राम्हण अफझलखानाचा वकील होता. अफझलखानाच्या वधानंतर ह्याच कृष्णाजी भास्कर कुळकर्णीने शिवरायावर चालून येत दोन वार केलेत. पहिला वार महाराजानी अडविला परंतु कुळकुर्णी चा दुसरा प्रहार एवढा भयंकर व प्राणघातक होता की, डोक्यावर पोलादी शिरस्त्राण असतानाही शिवरायाच्या मस्तकाला खोक पडली. शिरस्त्राण नसते तर अफझलखानाचे अपुर्ण कार्य कृष्णाजी भास्कर कुळकर्णीच्या हातुन पुर्ण झाले असते. आजपर्यंत शिवाजी महाराजावर वार करणारा कृष्णाजी भास्कर हा भट ब्राम्हण आहे हे समोर येतच नव्हते. समोर येत होता तो केवळ कृष्णाजी भास्कर. पण तो कोण आहे हे माहीतच पडत नव्हते. शिवाजी महाराजासोबत दगाबाजी व गद्दारी करणारा कृष्णाजी भास्कर हा भट-ब्राम्हण आहे हे बहुजनापासुन जाणुन-बुजून लपवून ठेवण्यात आले आणि दगाबाज व गद्दार म्हणून सुर्याजी पिसाळाला बहुजन समाजासमोर आणले. शिवाजी महाराजासोबत गद्दारी ब्राम्हण कुळकर्त्याने केली पण बदनाम बहुजन मराठा सुर्याजी पिसाळाला केले.