कुर्डुवाडी : पृथ्वीवरील झाडे माणसाने तोडल्या मुळे पृथ्वीचे तापमान वाढलेले आहे. या मुळे पाऊस वाढलेला आहे. जर माणसांनी झाडे लावून पृथ्वीचे वाढलेले तापमान कमी नाही केले तर भविष्यात सगळीकडेच प्रचंड मोठ्या गारपीटीला तोंड द्यावे लागेल. गारपिटीमुळे होणारी मोठी हानी टाळायची असेल तर माणसाने झाडे लावा असे आवाहन परभणी येथील हवामान तज्ञ पंजाबराव डख पाटील यांनी केले.
अरबी समुद्रा वरून मुंबई येथून महाराष्ट्रात ६ जूनच्या दरम्यान मान्सूनचे आगमन होते राज्यात झाडे मोठ्या प्रमाणावर तोडल्यामुळे ते पावसाचे ढग महाराष्ट्रात न येता गुजरातकडे चालले. परंतु मागील तीन वर्षांत हा पाऊस दिशा बदलून पूर्वेकडून येणाऱ्या ढगा मुळे पडू लागलेला आहे. या पावसाचे प्रमाणही जास्त आहे आपल्या राज्यात दर दहा वर्षांनी दुष्काळ पडतो परंतु या दहाव्या वर्षी दुष्काळ पडणार नाही कारण पृथ्वीचे तापमान वाढल्याने पावसाचे प्रमाण वाढले आहे. पुढील वर्षी समाधानकारक पाऊस पडणार आहे.