गोरेगाव, ता. १३ : ओबीसी सेवा संघाचे तिसरे अधिवेशन रविवारी (ता. १२) येथील गुरूकृपा लॉन येथे आयोजित करण्यात आले होते. अधिवेशनाचे उद्घाटन धनजंय वंजारी यांनी केले. अध्यक्षस्थानी प्रदीप ढोबळे होते. यावेळी जे. के. लोखंडे, बी. एम. करमकर, उपेंद्र कटरे, सावन कटरे, उमेश कोराम, डॉ. गुरुदास येडेवार, सविता वेदरकर, बबलू कटरे, संयोजक खेमेंद्र कटरे, मनोज मॅढे, संदीप तिडके, पुष्पा खोटेले, उमेश रहांगडाले, योगेश पारधी उपस्थित होते.
प्रदीप ढोबळे म्हणाले की, भारताचे संविधान धर्मनिरपेक्ष असून हिंदू राष्ट्राची मागणी करणेच गैरसंविधानिक आहे. पोटातलं हिंदू राष्ट्र वेगळे असून, भारताच्या लोकशाहीमुळे ते ओठावर आणता येत नाही. हे वास्तविक आहे. पाच हजार वर्षांपूर्वी भारतात आयांचे आगमन नव्हे तर इंग्रज मोघलांसारखे आक्रमणच होते. हे सत्य इतिहासातून लपविण्यात आले १९४७ ला मिळालेले स्वातंत्र्य हे राजकीय स्वातंत्र्य होते, सामाजिक नव्हे. संविधानिक लढाई लढायला पाहिजे. बाबासाहेबांनी संविधानात आपल्याला अधकार दिले. त्यामुळे आपणास आज शिक्षणासह नोकरीत प्रतिनिधीत्व मिळाले. हिंदू राष्ट्र संकल्पनेमुळे नाही वास्तव्य स्वीकारावे लागेल. मंडल आयोगामळे ओबीसींना आरक्षण मिळाले पण मंडल आयोगाच्या विरोधात कोणत्या विचाराचे लोक त्यावेळी व आजही आहेत. याचा विचार करावा लागेल असेही ते म्हणाले. अधिवेशन संयोजक हरिराम येळणे होते. संचालन भूमेश ठाकरे यांनी केले. आभार कार्याध्यक्ष रामेश्वर बागडे यांनी मानले.