तुकाराम माळी उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग
सांगली दि.२६ मार्च २०२३ - सर्वसामान्य माणसाच्या मनातला न्यायव्यवस्थेबद्दलचा आदर संपवण्याचा विडा मोदी सरकारने उचलला आहे हे आता सुर्यप्रकाशा एवढे स्पष्ट झाले आहे
राहूल गांधी यांनी कर्नाटकात कोलार येथी २०१९ साली केलेल्या एका भाषणावरुन गुजरात मधील सुरतमध्ये एक अब्रुनुकसानीचा खटला दाखल झाला होता.त्या भाषणात,नरेंद्र मोदी,नीरव मोदी, ललित मोदी या तीन लोकांच्या विरोधात भ्रष्टाचारी म्हणून वक्तव्ये राहूलजी गांधी यांनी केली होती .
त्या तिघांपैकी कोणीही ही फिर्याद दाखल केली नव्हती ,कोणातरी चौथ्याच माणसाने ही फिर्याद दाखल केली होती
सुरतेच्या ज्या कोर्टात हा खटला प्रलंबीत होता त्या फिर्यादीचाच उच्च न्यायालयात एक रिट याचीका दाखल करून खटल्याला स्थगिती मिळवली होती
पूर्वीच्या न्यायाधीशांची बदली झाल्याबरोबर रिट याचीका मागे घेण्यात आली कर्नाटकातल्या कोलार गावात केलेल्या भाषणावरुन सुरतमध्ये कोणाची अब्रुनुकसानी कशी झाली हे न्यायाधीश नक्कीच विचारु शकतात ज्यांनी हे भाषण दिले त्यांच्या मनात आकस अथवा पूर्वग्रह होते याला काय पुरावा नाही.
अशा प्रकारे घाई गडबडीत दिलेल्या निकालात जास्तीत जास्त दोन वर्षाची शिक्षा दिल्याने एवढा मोठा अनर्थ घडून राहुलजी यांच्यावर अन्याय झाला असल्याने केंद्र सरकारने चौकशी करून दुरूस्ती केली पाहिजे.आपली न्याय व्यवस्था निकोप असल्याचे दाखवून द्यावे. काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांनी उद्योगपती अदाणी यांच्या व्यवसायात वीस हजार कोटी रूपये कोणाचे आहेत याचे उत्तर मोदी यांना देता आले नाही तसेच देशाचे पैसे घेऊन पळालेल्या मोदींबद्दल चोर असे विधान केले होते परंतू भाजपचा खरा मुखवटा जनतेसमोर येऊ नये म्हणून त्यांनी ओबीसी समाजाचा आधार घेत देशांमध्ये ओबीसी समाजाचा अपमान झाला म्हणून महाराष्ट्र मध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात जे आंदोलन पुकारले आहे ते चुकीचे असून मोदी हे ओबीसी नसून ओबीसींचे खरे शत्रू संघ व भाजपा हेच आहेत.
आजपर्यंत ओबीसींच्या हितासाठी आणि आरक्षणासाठी काँग्रेस हा एकमेव पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे आणि ओबीसींची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे आंदोलन अजून तीव्र होऊ नये यासाठी भाजपने हे षडयंत्र रचले आहे परंतु ओबीसी भाजपच्या भूलथापांना बळी पडणार नाही, त्यामुळे भाजपने जे बेगडी आंदोलन चालू केले आहे ते त्वरित थांबवावे अन्यथा ओबीसी काँग्रेसकडून संपूर्ण देशभर आंदोलन छेडून भाजपचे पर्दाफाश करण्यात येईल. असे सांगली जिल्हा कॉग्रेस कमेटी आयोजित आंदोलनात तुकाराम माळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग उपाध्यक्ष म्हणाले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष विशालदादा पाटील, सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष विक्रमसिंह दादा सावंत, श्रीमती जयश्रीताई मदन पाटील वहिनी, बाबासाहेब कोडग,सुभाष खोत,अजित ढोले,सौ. मालन मोहिते,अशोकसिंग राजपुत, आशिष कोरी,देशभुषण पाटील, पैंगबर शेख, मोहनराव माने पाटील,आकाश बनसोडे आदी उपस्थित होत.