बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा

    चिमूर : नुकतीच बिहारमध्ये जातनिहाय जनगणना सुरु झाली आहे. जनगणनेची आकडेवारी राज्याच्या विकासासाठी त्यांचा उपयोग होणार आहे. महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करण्याबाबतची मागणी अनेक ओबिसी संघटना करत असून, गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी प्रलंबित आहे.

Conduct_a_caste-wise_census_of_OBC_in_the_state_of_Maharashtra_on_the_lines_of_Bihar      जनगणना हा विषय केंद्र शासनाशी संबंधित आहे. मात्र जातनिहाय जनगणना करण्यास केंद्र सरकारचे गृह राज्यमंत्री नित्यानंद रॉय यांनी लोकसभेत ओबसीची जातनिहाय जनगणना करणार नाही असे व्यक्तव्य व्यक्त केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने बिहार सरकारप्रमाणे जातनिहाय जनगणना करावी. अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमूर यांनी केली आहे. महाराष्ट्र सरकारने तसा ठराव ९ जानेवारी २०२० साली तत्कालीन सभापती नाना पटोले यांनी जातनीहाय जनगणनेचा ठराव मांडला होता. देशातील जातनिहाय जनगणना होऊन ९० वर्षे पूर्ण झाली आहे. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने फक्त अनुसुचित जाती व जमाती यांची जनगणना होते. बाकी धर्मावर आधारित सर्वांची एकत्रित गणना करण्याचे धोरण स्विकारले. यातुन मागासवर्गीय ओबीसी वंचित राहिले. सन १९९४ साली केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने ओबीसी जनगणना कशी आवश्यक आहे ते सरकारला अनेकदा पटवून दिले. सन २०१० च्या ५ मे ला संसदेत संसद सदस्य लालू प्रसाद यादव, स्व. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन. स्व. मुलायम सिंह यादव, शरदजी यादव, स्व. गोपीनाथ मुंडे, यांचेसह १०० खासदारांनी ओबीसी जनगणनेचा ठराव केला. त्यातुन २०११ ते २०१६ पर्यंत केंद्राने सामाजिक व आर्थिक जातगणना (२०११) केली. मात्र त्याची आकडेवारी जाहीर केली नाही. दिनांक ३१ आगस्ट २०१८ ला देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी २०२१ ची राष्ट्रीय जनगणना जातनिहाय करण्याचे आश्वासन पत्रकार परिषद घेऊन दिले होते. देशात सन २०२१ सालच्या नियमित जनगनणेचे काम अद्याप सुरू व्हायचे आहे. त्यात ही जातनिहाय गणना करावी अशी आमची सातत्याने मागणी आहे. तरी बिहारप्रमाणेच महाराष्ट्र शासनाने जातनिहाय जनगणना करावी यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमुर कडुन उपविभागीय अधिकारी कार्यालय चिमुर मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी रामदास कामडी, कवडू लोहकरे, प्रा. राम राऊत, अशोक वैद्य, नरेंद्र बंडे, विजय डाबरे, अविनाश अगडे, विलास डांगे, लता पिसे, पुष्पा हरणे, सविता चौधरी, वंदना कामडी, श्रुतिका बंडे, मिनाक्षी बंडे, कांचन खाटिक, माधुरी कामडी, दूर्गा वैरागडे, श्रीहरी सातपुते, माधवी अगडे, भारती हजारे, ईश्वर डुकरे, प्रभाकर पिसे, रविंद्र उरकुडे, शुभंम मंडपे, राजकुमार माथुरकर, प्रितम वंजारी, धनराज पंधरे, किशोर खोब्रागडे, ताराचंद बोरकुटे, धर्मदास पानसे, विनायक हजारे आदीसह ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.