नागपूर, दि. 17- मंडल आयोग कालचा होता.आता नचिपन आयोग लागू करा. तेव्हाच ओबीसी, मराठा व आरक्षण मागणाऱ्या जाती समूहांना न्याय मिळेल. त्यासाठी एकत्रितरित्या जनआंदोलन उभारण्यास सज्ज व्हा ! असे आवाहन ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष प्रदीप ढोबळे यांनी केले.
बानाईतर्फ आर्थिक आरक्षण धोरणावर आयोजित चर्चासत्रात प्रमुख वक्ते म्हणून ढोबळे बोलत होते. मंचावर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे, मराठा महासंघाचे दिलिप घोडके, बानाईचे राहुल परूळकर, ट्रायबल ऑफिसर्स फोरमचे बाबूराव गावराणे प्राचार्य बोरकर आदी होते.
प्रायार्य डॉ. बबनराव तायवाडे म्हणाले, 2014 पासून सत्तेच्या मनुची व्यवस्था आणण्याचा प्रयत्न. ते ओळखून आहेत. 100-200 लोकच जागृत आहेत. आमचा ओबीसी तर झोपला आहे. व्हाईट कॉलर लोकांना जागृत करावे लागेल. संसद बदलू. ते आंदोलनानेच शक्य आहे. त्यासाठी अशा चर्चा सत्रांची आवश्यकता आहे.
मराठा सेवा संघाचे दिलीप खोडके म्हणाले, 10 टक्के आरक्षण निषेधाने भागणार नाही.हा राक्षस संपवावा लागेल. 2014 मध्ये सामान्यांनी चूक केली. त्या विरोधात एकत्र यावे लागेल.
प्राचार्य बोरकर यांनी प्रास्ताविक करताना लक्षवेधक प्रझेंटेशन सादर केले. यावेळी 17 संघटनांचे पदाधिकारी हजर होते.
जय भारत जय संविधान