आ. छगनराव भुजबळ यांच्या लढ्यामुळे ओबीसींना न्याय मिळाला - नवनाथ वाघमारे

    घनसावंगी -अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगनराव भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील लढ्यास यश मिळाले असून ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने या निर्णयाचे जिल्हा समता परिषदेच्या वतीने आम्ही स्वागतच करत आहोत असे प्रतिपादन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष नवनाथ वाघमारे यांनी केले.

aamdar_Chhaganrao_Bhujbals_fight_brought_justice_to OBC_-_Navnath_Waghmare     यासंदर्भात समता परिषद जिल्हाध्यक्ष नवनाथ वाघमारे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या निर्णयाने जिल्हाभरात अनेक ठिकाणी तालुक्या, तालुक्यामध्ये फटाके फोडून पेढे वाटून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्यकर्ते व ओबीसी बांधवांनी आनंद उत्सव साजरा केला व सर्वो च्च न्यायालयासह छगनराव भुजबळ यांचे आभार मानले. गाव खेड्यामध्ये राहणाऱ्या ओबीसी समाजातील विविध जातींना स्थानिक स्वराज्य संस्था मधील आरक्षणामुळे राजकारणास्थान मिळत होते मात्र न्यायालयाने इम्पेरियल डाटा सादर करेपर्यंत ओबीसी समाजाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण स्थगिती दिल्याने गाव खेड्यातील ओबीसी समाज राजकारणापासून वंचित झाला होता यासाठी महाराष्ट्र सरकारने मागासवर्गीय आयोगाची
निर्मिती करून ओबीसी समाजाचा इम्पेरियल डाटा न्यायालयात सादर करावा यासाठी समता परिषदेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष छगनराव भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर विविध प्रकारचे आंदोलने करण्यात आली होती.

    जिल्ह्यामध्ये ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करावे, ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी, आदी मागण्यासाठी जिल्हाध्यक्ष नवनाथ वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली वेळोवेळी रास्ता रोको,निदर्शने, तालुक्या-तालुक्यात मोर्चे अशा विविध प्रकारची आंदोलने करण्यात आली होती. या आंदोलनाची दखल घेत महाविकास आघाडी सरकारने बांठिया आयोग स्थापन करून राज्यातील ओबीसी समाजाचा इम्पेरिकल डाटा न्यायालयात सादर केल्याने राज्यातील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत झाले आहे.सर्वो च्च न्यायालयाच्या या निर्णयाचे जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून एकमेकांना पेढे भरून आनंद उत्सव साजरा केला असल्याचे ही जिल्हा समता परीषद जिल्हाध्यक्ष नवनाथ वाघमारे यांनी म्हटले आहे.