मुख्यमंत्र्यांना पत्रातून इशारा
गोंदिया ओबीसी विद्याथ्यांसाठी वसतिगृह सुरू करावे, वसतिगृह सुरू होईपर्यंत १ सप्टेंबरपासून प्रत्येक जिल्ह्यात ५०० व विभागीयस्तरावर १००० विद्यार्थ्यांसाठी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फले यांच्या नावे स्वाधार योजना सरू करावी, अशी मागणी ओबीसी युवा अधिकार मंचने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे. सरकारने दुर्लक्ष केल्यास ओबीसी रस्त्यावर उतरणार, असा इशाराही देण्यात आला आहे.
ओबीसी विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित
१९३१ च्या जतनिहाय जनगणनेनुसार ५२ टक्के असलेल्या महाराष्ट्रातील ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण प्राप्त करण्यात अनेक अडथळे येत आहेत. उच्च शिक्षणासाठी विद्याथ्यांना शहरात जावे लागते. विद्यार्थ्यांना शहरात निवास आणि भोजनाची व्यवस्था नसल्याने ओबीसी विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहत असल्याकडेही कोरराम यांनी लक्ष वेधले आहे.
घोषणांचा प्रवास...
महायुती सरकारच्या काळात सामाजिक न्याय विभागाच्या ३० जानेवारी २०१९च्या सरकारी आदेशानुसार ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांसाठी ३६ वसतिगृहांना मान्यता मिळाली होती.
महाविकास आघाडी सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक जिल्ह्यात मलामलींसाठी दोन स्वतंत्र असे ७२ वसतिगृह होतील, असे सांगितले होते.
अजून एकही वसतिगृह उभे राहू शकलेले नाही.