जातीनिहाय जनगणना न झाल्यास आंदोलन : ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन

जातीनिहाय जनगणना न झाल्यास आंदोलन : अन्सारी

   ओबीसी आरक्षण संपवण्याचा कट काही मोठ्या पक्षांनी रचला आहे. गेल्या अनेक वर्षापासून ओबीसी समाजाची जनगणना झालेली नाही. ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना न झाल्यास मोठे आंदोलन उभारणार असल्याचे ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद अन्सारी यांनी सांगितले.

Agitation_if_no_caste_wise_census_-_All_India_Muslim_OBC_Organisation     अन्सारी म्हणाले, सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण कमी केले. तसेच आता जातीनिहाय जनगणना झाली नाही, तर अन्य आरक्षणही कमी होईल. १९३१ पासून आजपर्यंत ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना झालेली नाही. ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी, अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची आमची मागणी आहे. याबाबत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी संसदेत आवाज उठवलेला होता. तरी अद्याप ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली नाही. जातीनिहाय जनगणना झाली नाही, तर ओबीसींचे भवितव्य संपेल. गेल्या ४० वर्षांपासून ओबीसींच्या हक्कासाठी आम्ही लढा देत आहोत. जनावरांची जनगणना होते; मात्र ओबीसींची जनगणना होत नाही, ही आश्चर्यकारक बाब आहे.