पेठ : आरक्षणाच्या हक्कासाठी ओबीसींनी एकत्र येऊन लढले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती जगन्नाथ माळी यांनी केले. पेठ येथे महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या ओबीसी हक्क परिषदेत ते बोलत होते. वाळवा तालुका ओबीसी संघटनेचे अध्यक्ष धनपाल माळी यांनी सरकारने आमची खरी लोकसंख्या कोर्टात सादर करावी, अशी मागणी केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष शांताराम देशमाने यांनी आम्हाला आरक्षण मिळाले नाही तर निवडणुकांवर बहिष्कार घालू, असा निर्धार व्यक्त केला. फिरोज ढगे, चंद्रकांत पवार, ज्ञानेश्वर पेठकर आदींनी मनोगत व्यक्त केले. तुकाराम खटावकर, जवाहर डगे, रवींद्र जाधव, बजरंग सिद, रविकिरण बेडके, माणिक माळी उपस्थित होते. शुभम माळी यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन नामदेव भांबुरे यांनी केले. आभार शेखर बोडरे यांनी मानले.