पंकजा मुंडेंचे मोदी सरकारला रिमाइंडर
पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या संसदेतील सन २०११ मधील एक भाषण ट्विटर अकाउंटवरून शेअर केले आहे. या भाषणाद्वारे गोपीनाथ मुंडे हे केंद्र सरकारकडे स्वतंत्र ओबीसी जनगणनेची मागणी करत आहेत. त्यावेळी आयटी प्रवेशासाठी ओबीसी विद्यार्थ्यांना आरक्षण देण्यात आले होते. तसेच न्यायालयात ओबीसींची आकडेवारी सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने त्यावेळी दिले होते. मात्र, आमच्याकडे ओबीसींची आकडेवारीच उपलब्ध नसल्याचे सरकारने कोर्टाला सांगितल्याचे गोपीनाथ मुंडे आपल्या भाषणात सांगत आहेत. देशात एकूण ५४ टक्के ओबीसी समाज असल्याचेही मुंडे यांनी भाषणात म्हटले आहे.'